अद्याप शिवभोजन थाळी मोफत नाहीच - पुणे शिवभोजन थाळी लेटेस्ट बातमी
पुणे - राज्यात आजपासून(गुरूवार) सुरू झालेल्या संचारबंदीच्या कालावधीत राज्य सरकारची शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु, सर्क्युलर न आल्याचे कारण देत शिवभोजन थाळी सेंटरवर ग्राहकांकडून पैसे आकारले जात आहेत. पुणे महापालिकेजवळ असणाऱ्या थाळी सेंटरवर येणाऱ्या ग्राहकांकडून या थाळीसाठी पैसे आकारले जात आहेत. याविषयी शिवभोजन थाळी सेंटर चालवणाऱ्या व्यक्तीला विचारणा केली असता, अद्याप शासनाकडून थाळी मोफत देण्याविषयी ऑर्डर आले नसल्याचे सांगितले. या केंद्राजवळून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी...