Shirdi Sai Baba Darshan : आजपासून ऑफलाईन दर्शन पास सुरू.. दिवसभरात तब्बल 25 हजार भाविकांना घेता येणार साई दर्शन - साई भक्त
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून शिर्डीच्या साईबाबांचे 25 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. याआधी दररोज फक्त 15 हजार भाविकांना ऑनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शन घेता येत होते. मात्र ऑनलाईन पासच्या माध्यमातून भाविकांना अनेक अडचणी येत असल्याने भाविकांनी ऑफलाईन पासेस सुरू करण्याची मागणी साई संस्थानकडे केली होती. भाविकांना साई दर्शनासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता साई संस्थाने आजपासून 10 हजार भाविकांना ऑफलाईन पासेस देण्यास सुरू केले आहे. त्याच बरोबर ऑनलाईन पद्धतीने 15 हजार भाविकांना साई दर्शन दिले जाणार आहे. दिवसभरात एकूण 25 हजार भाविकांना साई दर्शन मिळणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.साईबाबा संस्थाने आजपासून साई मंदिराचा दोन नंबर प्रवेशद्वारासमोरील श्रीराम पार्किंगमध्ये चार ऑफलाईन पासेस काउंटर सुरू केली आहेत. त्याच बरोबर ऑफलाईन पासेस पूर्णत: मोफत दिलs जात असल्याने भाविकांचा चेहऱ्यावर एक वेगळाचा आनंद बघण्यास मिळाला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ऑफलाईन पासेस देण्यास संस्थाने सुरू केल्याने भाविकांची मोठी गर्दी झालेली पहिला मिळत आहे.