शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज? - Radhakrishna Vikhe Patil shirdi news
राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. तांबे यांनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचे सांगण्यात येत आहे.