Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्राने घेतले घेतले शनी दर्शन - Shilpa Shetty took darshan Shani Shingnapur
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांनी ( Shilpa Shetty in Shani Shingnapur ) आपल्या कुटुंबीयांसह शनी शिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेत पूजा केली. तसेच उदासीमहाराज मठात शनी अभिषेक केला व चवथऱ्याखालून दर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा सन्मान केला. मंदिर परिसरात शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.