शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत - Sanjay Raut latest Reaction
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, असे तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का, अफवांवर विश्वास ठेवू नका ? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे, असेही ते म्हणाले. शरद पवार हे काही दिवस आजारी होते त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार का, अशी कोणतीही चर्चा नाही.