Sharad Pawar on ST Strike : कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, आडमुठेपणा सोडा; शरद पवारांचे आवाहन - एसटी कर्मचारी संप
गडचिरोली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप(ST Workers Strike) मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा, अशी सूचना करत विलिनीकरणाची मागणी अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत पवारांनी दिले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा. मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते जमावाशी नाही, असेही शरद पवार म्हणाले. सध्या शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते गडचिरोली येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा. तसेच प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.