N.D. Patil For Last Respects : शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.एन. डी. पाटील
कोल्हापूर - महाराष्ट्राच्या राजकारणातील, समाजकारणातील, पुरोगामी चळवळीतील आधारवड असणारे (N.D. Patil For Last Respects) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.एन. डी. पाटील यांचे काल दुपारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वृध्दापकाळाने वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने पुरोगामी चळवळीचा मोठा आधार गमावला आहे. (Shetkari Kamgar Paksh leader N.D. Patil) दरम्यान, त्यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. त्यांच्यावर आज कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होत आहेत. त्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एन.डी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले.