Sushilkumar Shinde Criticized Bjp : भाजपाच्या हुकूमशाहीला लोक कंटाळलेत - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे - भाजप हुकुमशाही सुशिलकुमार शिंदे प्रतिक्रिया
पुणे - सध्या देशात भाजपची हुकुमशाही चालली आहे आणि या हुकूमशाहीला लोक कंटाळलेत. त्यामुळे लोक संधी शोधतायेत. ती संधी आली म्हणून धडाधड बाहेर निघत आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ( Senior Congress Leader Sushilkumar Shinde ) यांनी व्यक्त केले. पत्रकार भवन येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते आले होते. ( Sushilkumar Shinde Published Book in Pune ) यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi ) सोबत घडलेल्या घटने बाबतीत ते म्हणाले की; मोदींच्या सुरक्षेसाठी अनेक एजन्सी काम करतात. त्यांनी मोदींना कुठे काय रिस्क आहे कळवलं असेल. मात्र, राजकारणाचा भाग आहे म्हणून पंतप्रधान तसे बोलले असतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे म्हणाले.