'बेईमानीने आलेले, जनहिताचे निर्णय न घेता सुडाचे राजकारण करणारे सरकार जाणार' - विधान परिषद सुधीर मुनगंटीवार लेटेस्ट न्यूज
नागपूर - 'सरकारला संधी नसताना बेईमानी करून हे सत्तेत आले. राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी सुडाचे राजकारण करत आहे. असे सरकार टिकू शकत नाही म्हणून हे सरकार जाणारच,' असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते नागपुरात विमानतळावर बोलत होते. सरकार संकटात सुद्धा मदत करण्याऐवजी सुडाचे राजकारण करत आहे. जनहिताचे मुद्दे घेतले नाहीत, असा आरोप सरकार भाजपवर करत आहे. मात्र, भाजपने वीज बिलाचे मुद्दे घेतले. सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असे म्हटले होते. मात्र, अजून काहीच निर्णय घेतला नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. जनहिताचे प्रश्न विचारले की, मोहन डेलकरने आत्महत्या केली हे सरकारकडून सांगण्यात येते. चौकशी करा, शिक्षा करा असे आमचे सरकारला म्हणणे आहे. कोणी हात बांधलेत का तुमचे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. 'शेतकरी अडचणीत आहे. त्यांना मदत करा. वीज खंडित करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि नंतर पलटले. हे आश्चर्य असून खोटारडे सरकार आहे,' असा आरोपही त्यांनी केला.