महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ईडीसह किरीट सोमैयांना काश्मीरला पाठवा, दहशतवादी पळून जातील -संजय राऊत - etv bharat marathi

By

Published : Oct 18, 2021, 12:59 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने जम्मू काश्मीर प्रश्नावर बोलले पाहिजे. दुबईत क्रिकेट खेळला जाईल की नाही हे महत्वाचे नाही. तसेच, ईडी, सीबीआयचा वापर विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी करण्यापेक्षा त्यांना काश्मीरमध्ये पाठवा, त्यांच्यासोबत किरीट सोमैयांना पाठवा हे फार पावरफूल लोक आहेत. हे तिकडे गेल्यावर दहशतवादी पळून जातील असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत परिस्थिती तणावाची म्हणता येणार नाही. तर, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला आहे. कधी शिखांचे हत्याकांड होत आहे, कधी काश्मीरी पंडीतांना मारण्यात येत आहे तर कधी सामान्य माणसांना मारले जात आहे. हे सगळे घडते आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकारची, ग्रह मंत्रालयाची आहे. हे सगळे सर्जिकल ट्राईक करुन भागणार नाही. मात्र, तसे असेल तर चीनवर सर्जिकर स्ट्राईक करा. मात्र, काश्मीरची जनता रोज मरत असताना केंद्र सरकार मतलबी भूमीका घेत आहे. हे चालणार नाही. कित्येक दिवस जम्मू काश्मीरमधील बातम्या बाहेर येऊ दिल्या नाही. तीकडे इंटनेट, माध्यमांवर यांनी बंदी आणली होती. त्यामुळे खरी परिस्थिती लक्षात येत नाही असही राऊत म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details