सव्वा रुपये असो किंवा सव्वा कोटी रुपये, पैश्यांपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व असते - संजय राऊत - संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर प्रतिक्रिया
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा मानहाणीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. त्यावर ही किंमत वाढवावी, असे प्रत्त्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले होती. दरम्यान, यावर आता संजय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सव्वा रुपये असो किंवा सव्वा कोटी रुपये पैश्यांपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.