राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरली नाही - डॉ. संजय ओक - कोरोना दुसरी लाट
ठाणे - राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आली नसून, सध्याची दुसरी लाट अजून ओसरली नसल्याची माहिती महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ संजय ओक यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना दिली आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी थोडीफार कमी होताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत आहे. पण हा सर्व रेट मंदगतीने कमी होताना दिसत असल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे.