ठाण्यात मराठा समाजाचे आंदोलन, साखळी उपोषणाचा दुसरा दिवस - maratha agitation for reservation thane news
ठाणे : सर्वोच्य न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतर सर्वत्र मराठा समाज पेटून उठला आहे. त्यातच ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजचा सकल मराठा क्रांती मोर्चाचा साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. न्यायदेवतेने आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन मराठा समाजाचे गाऱ्हाणे ऐकावे यासाठी न्यायदेवतेचे प्रतिकात्मक रूप म्हणून एका लहान मुलीला उभे करून तिच्यासमोर नतमस्तक करताना मराठा समाज दिसत आहे. तरीही सरकारला जाग आली नाही, तर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशारा मराठा समन्वयक यांनी दिला आहे.