पुसदमधील चार दुकाने सिल; १५ हजारांचा दंड वसूल - यवतमाळ न्यूज अपडेट
यवतमाळ - पुसद शहरातील मुख्य बाजारपेठ गांधी चौक, मेन कापड लाईन, सुभाष चौक, वसंतराव नाईक चौक, बस स्टेशन परिसर, वसंत नगर व श्रीरामपूर या परिसरात विशेष मोहीम राबवून त्यामध्ये विशेषतः शासनाने दिलेल्या नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने चालू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये ४ दुकाने सील करण्यात आलीत तर ४ व्यापाऱ्यांना व ५ नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करून रु १५ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला. व्यापारी, नागरिकांनी सहकार्य करावे - सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत मात्र यानंतरही इतर ही दुकाने या भागात उघडी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत दंड आकारण्यात आला. कोरोना संबंधीचे नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे व सुरक्षित राहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी शहरवासियांना केले.