VIDEO : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांचे स्वागत - नवनिर्माण हायस्कूल
रत्नागिरी - जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार शाळांमधून 46 हजार विद्यार्थी हजर राहणार आहेत. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या नवनिर्माण हायस्कूल येथे रांगोळी, फुगे यांची सजावट केली गेली होती. शिवाय विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांची ओवाळणी देखील केली गेली. मुख्य बाब म्हणजे यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये देखील उत्साह होता.