महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

School of Education Department Select Yawatmal District : समग्र शिक्षण,पोषण अभियानासाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड - यवतमाळ जिल्हाधिकारी अमोड येडगे

By

Published : Jan 22, 2022, 8:24 PM IST

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी आज 26 राज्यातील 190 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचासुद्धा सहभाग होता. स्कुल एज्युकेशन ( School Education Department ) विभागाने देशातील आठ जिल्हे निवडले आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्याची निवड करण्यात आली आहे. स्कुल एज्युकेशन मार्फत चालणाऱ्या समग्र शिक्षण,पोषण अभियान या योजनामध्ये जिल्हा काम करणार आहे. यात येत्या दोन वर्षात केंद्र शासनाकडून सूचना मिळणार असून पुढील दोन वर्षातमध्ये जिल्हा प्रशासन काम करणार आहे. शाळा आणि विद्यार्थी याच्या विषयांनव्ये चांगली संधी या निमित्ताने जिल्ह्याला मिळाली आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे ( Collector Amol Yedge ) यांनी सांगितले. स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटने देशात नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे करण्यात आला होता. यातून यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, शिक्षणासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर केंद्र शासनाच्या भर राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details