अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीत बीडमध्ये हजारोंच्या संख्येने निघाली वृक्षदिंडी - sayaji shinde
देशातील एकमेव वृक्ष संमेलन बीड तालुक्यातील पालवण येथील वनराईच्या डोंगरावर 13 व 14 फेब्रुवारी रोजी होत आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी सकाळी शाळा- महाविद्यालयांच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी 'झाडाच्या नावानं चांगभलं' म्हणत वृक्षदिंडी काढली. या वृक्षदिंडी मध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचा विशेष सहभाग होता. याप्रसंगी एका पालखीमध्ये वृक्ष ठेवून त्या वृक्षांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
Last Updated : Feb 12, 2020, 2:08 PM IST