आस विठुरायाच्या भेटीची : माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान; पाहा, दिवेघाटातील परिस्थिती... - mauli palkhi in divghat
पुणे - ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा 2 जुलैला पार पडला होता. यानंतर आज (सोमवारी) संत ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रयाण केले. चोख बंदोबस्तात माऊलींच्या पादुका शिवशाही बसने पंढरीकडे निघाल्या आहेत. पायी वारीच्या वेळी दुमदुमणारा परिसरात यावेळी शांतता पाहायला मिळाली. दिवेघाटातील परिस्थिती काय होती? याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.