'कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत' - संजय राऊत बातमी
मुंबई - चक्रीवादळापेक्षाही देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूंच्या राशी पडत आहेत असा घणघणाती टोला खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. लसीकरणासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत, असेही ते म्हणाले. देशात कुणाचे फोन टॅपिंग होत नाही. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील. हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही आहे, असेही राऊत म्हणाले.