प्रभाकर साईल अत्यंत महत्वाचा साक्षीदार - संजय राऊत - आर्यन खान प्रकरण
प्रभाकर साईल अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहेत. त्याची सुरक्षा महत्वाची आहे. प्रभाकर साईलच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. प्रभाकरने देशावर आणि महाराष्ट्रावर उपकार केलेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. राज्य सरकाने सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहीजे. किरण गोसावी गायब आहेत. या बाबात भाजपाला माहीत आहे. जर काही केले नाही तर घाबरायेच काय कारण आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी झाली पाहीजे, असेही संजय राऊत म्हणाले.