पंजाबमधील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न - संजय राऊतांचं विधान - चंद्रकांत पाटील
मुंबई - पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनामा दिला तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्याप्रकारे गुजरातमध्ये रूपाणी यांनी राजीनामा दिला आणि तो भाजपचा अंतर्गत प्रश्न होता तसाच पंजाबचा प्रश्न काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी चंद्रकांत पाटलांवर देखील टीका केली आहे.