Sanjay Raut On Perfume Case : अत्तराच्या बुधल्या कोण रिकामे करत होते?, राऊतांचे भाजपला टोले; पहा काय म्हणाले राऊत - संजय राऊत पत्रकार परिषद
मुंबई - आपल्या देशात अत्तरवर राजकारण होऊ शकतो इतका आपला देश सांस्कृतीकदृष्ट्या महान झाला आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोले लगावले आहेत. (Sanjay Raut Perfume Case) ते पत्रकारांशी बोलत होते. आता या अत्तराच्या प्रकरणात देशात प्रत्येकाला वाटत की आपण अत्तर विकायला हव. तसेच, राजकारणामध्ये प्रत्येकाला त्या अत्तराची गरज आहे. (Sanjay Raut Comment On Perfume Case) कारण प्रत्येकजण त्या अत्तराच्या सुगंधा शिवाय राजकारण करू शकत नाही असा टोलाही राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. दरम्यान, या अत्तराच्या बुधल्या कोण रिकामे करत होते हे सर्वांना पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात सर्वांना दिसलेच आहे असही राऊत म्हणाले आहेत. (Perfume Businessman Arrested) यावेळी राऊत मुंख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबतही बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत उत्तम असून ते लवकरच आपल्या सेवेत रुजू होतील. तसेच, या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जबाबदारी फार चांगली संभाळली आहे अशी स्तुतीसुमनेही त्यांनी पवार यांच्यावर उधळली आहेत.
Last Updated : Dec 29, 2021, 2:29 PM IST