संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया - bjp-leader-chitra-wagh on sanjay-rathod
मुंबई- वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्र्यांनी तो अजून स्वीकारलेला नाहीये. मुख्यमंत्र्यांनी तो लवकरात लवकर स्वीकारला पाहिजे. राजीनामा आधीच यायला पाहिजे होता, मात्र पंधरा दिवस संजय राठोड कुठे गायब होते? असा थेट सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात भाजप राजकारण करत नसून स्वतः संजय राठोड यांनी गलिच्छ राजकारण केले आहे. राजीनामा ही फक्त पहिली पायरी आहे असून यामध्ये कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असून त्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी