Sangli Drone Visuals: सांगलीच्या महापूराची भिषणता बघा आकाशातून, थरारक दृष्ये - महाराष्ट्र पाऊस
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन सांगलीत नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीने 40 फूट इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे कृष्णेची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण झाले आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाह सध्या कृष्णेच्या पात्राबाहेर नागरी वस्तीत शिरल्याचे पाहायला मिळत आहे. नदीच्या या रौद्र रूपाचे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून चित्रण करण्यात आले आहे. सांगलीतील हौशी फोटोग्राफर जिगर इनामदार यांनी आपल्या ड्रोन कॅमेरेच्या माध्यमातून ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी घेतलेले ही दृश्ये...
Last Updated : Jul 23, 2021, 1:06 PM IST