लोकल टू व्होकल : विविध रंगांचे आणि मॅजिकल फटाके खरेदीकडे अमरावतीकरांचा कल - Chinese firecrackers
अमरावती शहरात जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकासमोर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सायन्स कोर मैदानावर फटाक्यांचे मार्केट थाटले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने या मैदानावर फटाक्यांचे मार्केट लावण्याची परवानगी दिली असून या ठिकाणी 60 ते 70 फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. फटाक्यांच्या या बाजारात भारतीय फटाक्यांसोबतच चायना निर्मित फटाक्यांची विक्री होताना दिसते आहे. कोरोनामुळे गतवर्षी फटाक्यांचा व्यवसाय हवा तसा झाला नसताना यावर्षी सुद्धा अमरावतीकरांचा फटाके घेण्याचा उत्साह अधिक असा जाणवत नाही आहे. लहान मुलांच्या समाधानासाठी तसेच महालक्ष्मी पूजनानंतर अंगणात फटाके फोडावेत यासाठी अमरावतीकर फटाके खरेदी करीत आहेत. पारंपारिक फटाक्यांचं प्रकाशाचा झगमगाट करणारे फटाके लहान मुलं खरेदी करीत आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या पेक्षा विविधरंगी प्रकाशाची उधळण करणाऱ्या फटाक्यांना या वेळी अधिक पसंती ग्राहक देत असल्याचे चित्र या फटाका बाजारात पाहायला मिळते आहे.
Last Updated : Nov 4, 2021, 1:03 PM IST