VIDEO: पोलीस ठाण्यात कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी उपाययोजना - मुंबई पोलीस कोरोना सुरक्षा
मुंबई - कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हळूहळू राज्यात अनलॉकच्या दिशेने पावले उचलत उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारी आस्थापनांमध्येही कर्मचाऱ्यांची उपस्थिती टप्प्याटप्प्याने वाढवली आहे. पोलीस विभागामध्येही करोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मुंबई शहरातील 94 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार किंवा मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीला अनुसरून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हॅन्ड सॅनीटायझर व मास्कचा पुरवठा पोलीस कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी....