महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rajesh Tope on Air Travel : राज्याअंतर्गत विमान सेवेसाठी आरटी-पीसीआर चाचणीची गरज नाही - राजेश टोपे - COVID-19 guidelines

By

Published : Dec 1, 2021, 2:17 PM IST

Updated : Dec 1, 2021, 5:12 PM IST

जालना - राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. राज्यात अद्याप लॉकडाऊन लागणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही. बाहेर देशातून आलेल्या नागरिकांना म्हणजेच तो इतर राज्यात आलेला असेल आणि त्यानंतर तो राज्यात आला तर त्याला RTPCR चाचणी बंधनकारक असणार असून ७ दिवस क्वारंटाईन राहणे बंधंनकारक राहील असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते. सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
Last Updated : Dec 1, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details