पक्षसंघटन वाढविण्यासाठी तळागाळापर्यंत प्रयत्न करणार - रोहिणी खडसे - रोहिणी खडसे खेवलकर प्रतिक्रियी
जळगाव - पक्षसंघटन वाढविण्यासाठी तळागाळापर्यंत प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर एकनाथ खडसेंनी अचूक 'टायमिंग' साधले आणि राजकीय वारसदार म्हणून कन्या रोहिणी यांच्याकडे सूत्रे सोपविली की काय? अशी चिन्हे आगामी काळात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. पाहूयात, त्या काय म्हणाल्या...पाहूयात, त्या काय म्हणाल्या...