VIDEO : शेलुबाजार येथे दोन घरात चोरी; 50 हजारांचा ऐवज लंपास - robbery at shelubazar news
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल रात्री झालेल्या घरफोडीत शेजारील पाच घराचे दरवाजे बाहेरुन लावले आणि नंतर रामदास चौधरी, आणि जानराव राठोड यांच्या घरात प्रवेश करून दोन मोबाईल आणि रोख रक्कम, असा जवळपास 50 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. दरम्यान, चोरी करण्यासाठी आलेले चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.