VIDEO - गगनबावडा तालुक्यात अणदूर-धुंदवडे रस्ता खचला...सुमारे २० गावांचा तुटला संपर्क - कोल्हापूर पाऊस अपडेट
कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. अशा स्थितीत भुस्खलनच्या घटना घडत आहेत. गगनबावडा तालुक्यातील अणदूर -धुंदवडे हा 15 फुटांचा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. कडवे, गुरववाडी, शेळोशी भागात भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुका हा अतिदुर्गम आणि सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका आहे. रस्ता खचल्यान धुंदवडे, चौधरवाडी, खेरीवडे, शेळोशी, जरगी,गारीवडे, बोरबेट, बावेली, कडवे, चौके, मानबेट, कंद गाव, राही, म्हासुर्ली, गवशी, कोनोलीसह वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.