अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीनंतर मुंबईत ड्रायफ्रूट्सच्या किंमतीत वाढ - मुंबईत ड्रायफ्रूट्सच्या किंमतीत वाढ
मुंबई - अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा परिणाम आता भारतीय बाजारावरही होत आहे. मुंबईत ड्रायफ्रुट्सच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत बदामांची किंमत 680 होती, आता बदाम 1050 रुपये किलो इतके झाले आहेत. याशिवाय बाजारात काजू, पिस्ताच्या किंमतीही वाढल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी हे दर वाढू शकतात, असे विक्रेत्यांचे मत आहे.