विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील अपघातात रिक्षाचालक जखमी - mumbai accident news
मुंबई - विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पोलीस ठाणे परिसराकतील पादचारी पुलाखाली बुधवारी सकाळी 11च्या सुमारास 407 या टेम्पोने रिक्षा MH 02 FF 1533 व मारुती सुपर कॅरी या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात मारुती सुपर कॅरी हा टेम्पो पलटी झाला असून गाडीचालक राम यादव हा सुदैवाने बचावला आहे. रिक्षा चालकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णलयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यावेळी काही वेळ विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले असून पलटी झालेला टेम्पो बाजूला करण्याचे काम चालू आहे.