निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
पालघर - निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने आज(16 नोव्हेंबर) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. कर्मचारी वेतन योजनेअंतर्गत असंघटित पेन्शनधारकांना अत्यल्प पेन्शन मिळत असून भगतसिंह कोश्यारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन पंतप्रधान मोदींच्या नावे निवेदन देण्यात आले. गेल्या सात वर्षात व कोरोना काळात न्यायाच्या प्रतीक्षेत आजवर अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू झाला असून 16 नोव्हेंबर हा दिवस या संघटनेकडून निषेध दिन म्हणून पाळण्यात आला.