तौक्ते चक्रीवादळ: मुंबईतील परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट - तौक्ते चक्रीवादळा बद्दल बातमी
मुंबई - पावसाने जोरदार वाऱ्यासह शहरात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासाता दक्षिण भारतात पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेकडो घरांची पडझड झाली असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वाटचाल करत आहे. वादळामुळे काही गाड्या दक्षिण पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून अर्धवट किंवा पूर्णपणे रद्द कराव्या लागल्या आहेत. मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत बंद राहतील. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिका तत्परतेने कामाला लागली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागातर्फे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. वादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे बर्याच ठिकाणी झाडे पडली आणि समुद्रामध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत.