महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'मतकरींशी गप्पा - आठवणींना उजाळा' - ratnakar matkari interview

By

Published : May 18, 2020, 6:51 PM IST

Updated : May 18, 2020, 7:08 PM IST

हैदराबाद - ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. लोकशाहीच्या गुन्हेगारीकरणापासून श्रद्धेच्या बाजारीकरणापर्यंत, समाजाच्या सांस्कृतिक फुटकळीकरणापासून शासनाच्या निगरगट्टीकरणापर्यंत, साहित्यिकांच्या बोटचेपेपणापासून साहित्यिक व्यासपीठांवर असांस्कृतिक उठाबशापर्यंत अनेक ज्वलंत प्रश्नांवर मतकरी स्वत:ची भूमिका परखडपणे मांडत राहिले. प्रश्न राजकारण्यांच्या मुजोरीपणाचा असो, नर्मदा आंदोलनाचा असो किंवा अंधश्रद्धेचा, त्या प्रश्नांवर व्यक्त होणे मतकरींना कायमच आपली सामाजिक बांधिलकी वाटत आली. पाहूयात, 'ईटीव्ही'ने वृत्तवेधच्या दिवाळी विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 नोव्हेंबर 2005 रोजी घेतलेली त्यांची मुलाखत.
Last Updated : May 18, 2020, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details