Cotton Rate Hike : अमरावतीत कापसाला विक्रमी दर; शेतकरी सुखावला - अमरावती कापूस उत्पादक शेतकरी सुखावला
अमरावती - नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेल्या कापसाला आतापर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे. यंदा कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे मागणी वाढली आहे. अशातच अमरावतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत कापसाला सर्वोच्च १०,१५० रुपये प्रति क्किंटल दर मिळाला आहे. संकटाच्या काळात पांढरे सोने चमकल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भात सोयाबीननंतर कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. कापसाला १०,१५० रुपये दर पहिल्यांदा मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर यापुढे कापूस १२ ते १३ हजार रुपये प्रति क्किंटल जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.