Ratnagiri Flood : डोंगराखाली 7 घरं, 17 माणसं गाडली; 4 मृत्यू - पोसरे खुर्द डोंगर कोसळला 4 मृत्यू
रत्नागिरी - खेड तालुक्यातील पोसरे खुर्द - बौद्धवाडीत अख्खा डोंगर खाली कोसळला आहे. यामध्ये 7 घरं, 17 माणसं गाडली गेली आहेत. सध्या एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू आहे. मात्र हे शोधकार्य अतिशय आव्हानात्मक आहे. आतापर्यंत 4 मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेची खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केली. 'मानवी पद्धतीने हा ढिगारा बाजूला करणे शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी मशनरी कशा पद्धतीने पोहचतील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. तसेच मदतीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. शिवाय, केंद्राकडूनही जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे', असे तटकरेंनी सांगितले.