VIDEO : आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर खालच्या पातळीवर टीका; आमदार लोणीकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल - Rajesh tope
जालना - राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अतिवृष्टीचे नुकसान आणि पीक विमाच्या मागणीसाठी आंदोलन केले. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीज वसुली थांबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल भाजपा आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकार्यांना घेराव घालत नाराजी व्यक्त केली. यावेळी लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन निषेधार्थ वक्तव्य केले होते. याच विधानाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून जाहीर निषेध करण्यात आलाय. त्याचबरोबर तालुका जालना पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पोलिसात तक्रार देण्यात आली.