Raosaheb Danve Chritisize Uddhav Thackeray : 'राज्यातील परीक्षा घोटाळ्यात विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्याचा हात'
जालना - राज्यात ज्या-ज्या परीक्षेत घोटाळे झाले. त्या घोटाळ्यात त्या-त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या उपस्थितीत जालन्यातील कलश सिड्सच्या सभागृहात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीसप्ताहानिमित्त अटलजी ते मोदीजी सुशासनाचा प्रयास'या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.