Video : भाजप-सेना एकत्र आल्यास महाराष्ट्राचा विकास शक्य - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - BJP-sena
यवतमाळ - नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे जर दोन पक्षासोबत खुश नसेल तर त्यांनी पुन्हा भाजप सोबत यावे. त्यांचे स्वागत आहे. भाजपा-सेना सरकार बनली तर महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागेल, वक्तव्य त्यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री आज यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असता विश्रामगृहावर ते बोलत होते.