Video : शिवसेना भाजपासोबत येत असेल तर आनंदच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - रिपब्लिकन पार्टी
पंढरपूर - शिवसेनेने सत्तेसाठी भाजपाचा मित्रपक्ष म्हणून सोबत यावे ही आमची इच्छा आहे. मात्र त्यासाठी शिवसेनेची इच्छा असणे गरजेचे आहे. शिवसेना महाविकास आघाडी सोडून भाजपासोबत येत असेल तर आनंद असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात व्यक्त केले. माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते सांगोला येथे आले होते. त्याचवेळी त्यांनी पंढरपुरातील विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच समान नागरी कायद्याबद्दल देखील काही मतं व्यक्त केली.
Last Updated : Aug 19, 2021, 11:31 AM IST