कोल्हापूर : सर्वपक्षीय महामार्ग रोको आंदोलन; वीज कनेक्शन तोडू न देण्याचा शेट्टींचा इशारा - कोल्हापूर राजू शेट्टी वीजबिल माफी आंदोलन न्यूज
कोल्हापूर - लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरात सर्वपक्षीय महामार्ग रोको आंदोलन होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करत असून शासनाला वीजबिल माफ करायला भाग पाडू असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय सध्या सक्तीने वीजबिल वसुली सुरू आहे. ती सुद्धा आता बंद पाडून वेळ पडल्यास कायदा सुद्धा हातात घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..