VIDEO : कोरोना नियमात शिथिलता, काय बंद, काय सुरू? पाहा... - कोरोना
मुंबई - मुंबईत येत्या १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल रेल्वेमधून प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. तसेच काही कोरोना नियम शिथील करण्यात आले आहेत. त्याची फाईल आरोग्य विभागात गेली होती. त्यावर सह्या करण्यात आल्या आहेत. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. - डबल डोसचे प्रमाणपत्र दाखवल्यास मासिक व त्रैमासिक रेल्वे पास मिळणार - बळजबरीने प्रवास केल्यास 500 रुपये दंड - खुल्या प्रांगणात विवाह सोहळे असतील त्यांना 200 आणि हॉलमध्ये 100 लोकांना परवानगी - खासगी अस्थापणाने पूर्ण सक्षमतेने सूरु करण्यास परवानगी - खासगी ऑफिस 24 तास खुले ठेवण्यास संमती - दुकाने 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी - सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार - धार्मिक स्थळांची दारं बंदच राहणार - इनडोअर स्पोर्ट्ससाठी 2 डोस बंधनकारक, असे नवीन नियम आहेत.
Last Updated : Aug 11, 2021, 8:43 PM IST