Raj Thackeray to visit Ayodhya : अयोध्येला जाण्याची तयारी पूर्ण, लवकरच तारीख निश्चित करणार - बाळा नांदगावकर - मनसे नेते बाळा नांदगावकर माहिती
मुंबई - अयोध्येला जाण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय झाला (Raj Thackeray to visit Ayodhya) आहे. त्यासंदर्भातली तयारीही पूर्ण झाली आहे. पण ती तारीख ठरायची आहे. आमची अयोध्येला जायची तयारी झाली आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी सांगितले. या महिन्यामध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले. 6 डिसेंबरला पुण्यात पदाधिकारी बैठक आहे. 14 डिसेंबरला मराठवाडा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक असणार आहे. 16 डिसेंबरला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, तर कोकण पदाधिकाऱयांबाबत तारीख ठरायची आहे, असे नांदगावकर म्हणाले.