VIDEO: अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषद - राज ठाकरेंची मनसुख हिरेन प्रकरणी प्रतिक्रिया
मुंबई - मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर स्फोटकांसह आढळून आलेल्या कार प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, मूळ मुद्दा बाजूला जात आहे. हे प्रकरण फार वेगळे आहे. त्यांच्या घराबाहेर पोलिसांना बॉम्ब ठेवायला लावणेही क्षुल्लक गोष्ट नाही, त्यामुळे या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करून केंद्रीय तपास यंत्रणांकडून निस्पक्षपणे तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.