यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
यवतमाळ - मंगळवारी यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्याला दुपारी 4 वाजताच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 16 ते 18 मे दरम्यान विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. अचानक सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळून पडली. तर वादळात विद्युत तारे तुटल्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पंधरा ते वीस मिनिटे जोरदार झालेल्या पावसाने नाले वाहू लागले. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासूून सुटका मिळाली असुन शेतकऱ्यांना उन्हाळी मशागत करण्यास सोयीस्कर झाले आहे.