अमरावती : गहू काढणीला आला होता; मात्र, रात्री पाऊस आला अन् होत्याचं नव्हत झालं - पाऊस बातमी अमरावती
अमरावती - जिल्ह्यात मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जबर फटका बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मंगळवारी विजांच्या कडकडाटात व वादळी वाऱ्याने हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सोबतच काढणीला आलेला हरभरा शेतातच भिजल्याने त्यालाही कोंब फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.