यवतमाळ : पूस धरण ओव्हरफ्लो; जुलै महिन्यातच भरले शंभर टक्के - pus dam overflow yawatmal
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - पुसद शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण आज ओव्हर फ्लो झाले. ओव्हर फ्लो झालेले धरण पाहण्यासाठी पुसदकरांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे. पुसद परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाने अवघ्या 13 दिवसात पुस धरणाचा जलसाठा 62 टक्क्यांनी वाढला आहे. यावर्षी जुलै महिन्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सारखा पाऊस कोसळल्याने पूस धरण 100 टक्के भरले आहे. पुस धरणाच्या सांडव्यावरून 22 सेंटीमीटर घनतेने 47.87 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशी माहिती पूस प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता अमोल जाधव यांनी दिली. पुसद तालुक्यात आतापर्यंत 471 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.