Pune NCP Agitation over Coffee Table Book : पुण्यात कॉफी टेबलबुक वरून भाजपविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - पुणे भाजप कॉफी टेबल बुक
पुणे - पुणे मनपात सत्ताधारी भाजपाकडून आपल्या कामांचे माहिती देणारे एक कॉफीटेबल ( Pune MNC Bjp Coffee Table Book ) बुक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. ( Pune NCP Agitation over Coffee Table Book ) राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, या कॉफीटेबल बुकमध्ये भाजप आपल्या चांगल्या कामात बद्दल माहिती देत आहे. मात्र, कोरोना काळामध्ये सत्ताधाऱ्यांकडून ज्या काही चुका झाल्या त्याचा या कॉफीटेबल बुकमध्ये उल्लेख नाही. पुणे महानगर पालिकेने 39 लाख रुपये खर्च करून कॉफी टेबल बुक छापण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी सत्ताधारी भाजप करत आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.