महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Metro Starts Soon : पुणेकरांच्या सेवेत लवकरच धावणार मेट्रो, जलदगतीने काम सुरु - वानज गरवारे मेट्रो स्टेशन

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jan 8, 2022, 5:34 PM IST

पुणे : पुणेकरांची बहुप्रतिक्षित मेट्रो आता लवकरच सुरू होणार ( Pune Metro Starts Soon ) आहे. पुण्यातील गरवारे या मेट्रो स्टेशनचे ( Garware Metro Station Pune ) काम 95 टक्के पूर्ण झाले असून, लवकरच पुणेकरांचा मेट्रोने प्रवास सुरु होणार ( Pune Metro Journey Begins Soon ) आहे. पुणेकरांना मेट्रोमध्ये प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या काही वर्षापासून पुण्यातील मेट्रोचे काम सुरू होते. यातील वनाज आणि गरवारे स्टेशन्सचे काम ( Wanaj Garware Metro Station ) अतिशय जलद गतीने पूर्ण झालेले आहे. सदर मेट्रो स्टेशनमध्ये सध्याला सरकते जिने, लिफ्ट, तिकीट काऊंटर आदींची कामे पूर्ण झाले असून, सामान्य नागरिकांना लवकरच हे सुसज्ज आणि अद्यावत असं मेट्रो स्टेशन पहायलाही मिळेल. या मेट्रोतून प्रवास करण्याची पुणेकरांची अनेक महिन्याची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रोच्या वेगाच्या चाचण्या ( Pune Metro Speed Test ) सुरू असून, पुणेकर मेट्रोने प्रवास सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'ने..

ABOUT THE AUTHOR

...view details